Traditional तामिळनाडू मध्ये डोसा मध्ये नाही वापरत पुढील पदार्थ.
सोडा
रवा
दही
चना डाळ
Eno
मुरमुरे
पोहे
साबुदाणा
वरील सर्व पदार्थ तामिळनाडू मध्ये डोसा बनवताना जनरली वापरत नाहीत.
आणि तिथे instant डोसा न अंबावता बनवत नाहीत.
तुम्ही म्हणाल निर डोसा लगेचच इन्स्टंट बनवतात. पणं तो मेंगलुर साईड ला जास्त बनवतात.
आपण पाहत आहोत तामिळनाडू डोसा.
मग कोणते पदार्थ वापरतात?
लिहून घ्या साहित्य:
तीन कप तांदूळ
एक कप उडीद डाळ
एक चमचा मेथी
बास ह्या तीन पदार्थांनी डोसा बनवतात.
तामिळनाडू मध्ये उडीदडाळ सालासकट काळे उडीद भिजवतात. किंवा पांढरे अख्खी उडीद डाळ वापरतात.
तांदूळ इडली rice वापरतात.
आपण उडिद डाळ साधी वापरली तरीही चालेल
तांदूळ मात्र इंद्रायणी सारखे चिकट भात होणारे वापरू नये.
साधा रेशन चा तांदूळ वापरू शकतो.
सकाळीं तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून वेगवेगळ्या भांड्यात भिजत टाका.
मेथ्या तांदूळ मध्येच भिजत टाका.
चार तासानंतर पेस्ट बनवायला घ्या.
तांदूळ पाण्यातून काढून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
त्यानंतर उडीद डाळ वाटा.
तांदूळ डाळ वाटत असताना पाणी लागेल ते उडीद डाळ भिजवलेले पाणीच वापरा.
दोन्ही वाटण एकत्र मिक्स करा.
हाताने पाच मिनिट मिक्स करत रहा.
तुमच्या हाताच्या उष्णतेने पीठ फुगायला मदत होईल.
झाकून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याची consistency पाहून पाणी मिक्स करा.
नेहमीप्रमाणे डोसे करा.
एका वाटीत पाणी आणि चिमुटभर मीठ टाकून ढवुळन घ्या.
तव्याला आधी चांगले तापवून त्यावर मिठाचे पाणी शिंपडावे.
ते पाणी कांदा अर्धा कापुन तव्यावर फिरवून घ्या किंवा एक टिश्यू पेपर घडी करुन वापरा.
गोल चपटे बुड असणाऱ्या साध्या वाटीने तव्यावर पीठ सोडून वाटीचे बुड गोल गोल फिरवत डोसा पेस्ट तव्यावर पसरवा.
एक मिनिटांनी उलथने घेवून डोसा वर आलेल्या घड्या पसरवा. एक चमचा तेल सगळीकडे डोसा वर सोडा. कडा आपोआप सुटू लागतील.
अलगद डोसा पलटून टाका किंवा एक बाजू कुरकुरीत करुन तसाच ताटात काढून घ्या.
तामिळनाडू मध्ये पेस्ट proper आंबवून च डोसा बनवतात.