बेसन आणि रवा मिक्स इडली ढोकळा

  • Post author:
  • Post category:Food
  • Post comments:0 Comments
बेसन रवा इडली ढोकळा

हा पदार्थ इडली पात्रात बनवा. इडली सारखा दिसणार पणं चव त्याची ढोकळा सारखी असणार.

काहीही म्हणा, पणं पदर्थ अतिशय healthy आहे. पटकन बनतो. तूम्ही मुलांच्या डब्यातही देवु शकता.

साहित्य:

अर्धा कप रवा

अर्धा कप बेसन पीठ

चवीनुसार मीठ

अर्धा वाटी दही

चिमुटभर हिंग

दोन टेबल स्पून तेल ( mustard किंवा शेंगदाणा नको)

वरील सर्व पदार्थ मिक्सर जार मध्ये टाका. जार फिरवून घ्या.

पाणी adjust करा. साधारण अर्धा कप पेक्षा कमी पाणी टाकून फिरवा. बाजूला ठेवून द्या. रवा फुगत राहील.

तुम्हाला फेटत्त बसायची गरज नाही.

एक टेबल स्पून साखर टाका. थोडे मीठ टाका, चमच्याने साखर विरघळून घ्या.

फोडणीसाठी साहित्य: तडका देयच्या भांड्यामध्ये एक टेबल स्पून तेल घ्या, गरम करा, मोहरी, तीळ, हिंग, कडीपत्ता, दोन हिरव्या मिरच्या उभ्या लांब चिरून टाका. मोहरी तीळ तडतडली की गॅस बंद करा. त्यात अर्धा कप पाणी टाका.

एक टेबल स्पून साखर टाका. थोडे मीठ टाका, चमच्याने साखर विरघळून घ्या. फोडणी तयार आहे. बाजूला ठेवून द्या.

इडली ढोकळा बनवायची कृती:

इडली पात्रात ठेवा. सात आठ मिनिट ठेवा. थंड झाल्यावर एका मोठया प्लेट मध्ये काढा.

बाउल मधील मिश्रणात एक छोटा इनो पॅकेट टाका. त्यावर दोन चमचे पाणी टाका.. दोन तीन वेळा फेटून घ्या. पटकन तेल लावलेली इडलीची प्लेट्स भरा. जास्त भरू नका. इडली बनवतो तसे same भरा.

त्यावर तयार फोडणी सर्व इडली वर पसरेल असे चमच्याने टाकून घ्या. चिंचेचा सॉस, किंवा केचप वरुन थोडा थोडा टाकून घ्या.

हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

———————————————————-

हिरव्या चटणीची दोन प्रकारे कशी बनवायची रेसिपी post केली आहे. Food categary मद्ये नक्की वाचा.

suha

Hey, I am an Indian and my name is Suha. My passion is writing.

Leave a Reply